दबंग अभिनेता सलमान खानची मागील हिरॉईन सई मांजरेकरच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Follow us on
दबंग अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी काळात प्रदर्शित होत असलेल्या ‘राधे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यातच आता त्याची मागील हिरॉईन सई मांजरेकरच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सई मांजरेकर या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
या लूकमध्ये सई मांजरेकरने ब्लॅक आऊटफिटमध्ये चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
सई मांजरेकरने सलमान खानसोबत पदार्पण केलं होतं. नुकताच तिने सलमान खानसोबत काम करण्याचा आपला अनुभव शेअर केला होता.
यात सई म्हणाली, “प्रामाणिकपणे सांगायचं तर सलमान खान यांच्यासोबत काम करणं हे माझं स्वप्न साकार होण्यासारखं होतं. सलमान सर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत रोमांच आणि उत्साहासोबतच मोठ्या जबाबदाऱ्या देखील येतात.”
“माझी स्क्रीन टेस्ट झाली तेव्हाच मला माहिती होतं की माझा पहिलाच टेक मला माझ्या लहानपणापासूनच्या आवडत्या अभिनेत्यासोबत करण्याची संधी देणार की नाही हे ठरवणार आहे. माझा शुटिंगचा अनुभव देखील खूपच चांगला होता,” असंही सई म्हणाली.
सई मांजरेकर मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. महेश मांजरेकर सलमान खानचे जवळचे मित्रही आहेत. त्यामुळेच सलमानने सईला लॉन्च केल्याचीही चर्चा आहे.