
अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने काही काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला होता. अजूनही ती तिथे दमदार काम करतेय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता मेनन आहे.

श्वेता आणि सलमान यांनी 'बंधन' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ही अभिनेत्री आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. श्वेताने तीन कॅमेऱ्यांद्वारे तिच्या डिलिव्हरीचं लाइव्ह शूटिंग केलं होतं. यातील काही भाग 'कालीमन्नू' या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं.

या चित्रपटासाठी श्वेताने जवळपास 45 मिनिटांचा तिच्या डिलिव्हरीचा शॉट घेतला होता. कॅमेऱ्यासमोरच तिने मुलीला जन्म दिला. श्वेताने तिच्या मुलीचं नाव सबैना असं ठेवलं आहे. त्यामुळे ही अभिनेत्री खूप चर्चेत होती.

श्वेताने 1994 मध्ये 'मिस इंडिया' या नामांकित सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. याच काळात तिची भेट ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्याशी झाली होती. श्वेता ही स्पर्धा जिंकू शकली नसली तरी टॉप 5 मध्ये तिने आपलं स्थान निर्माण केलं होतं.

श्वेताने 'बंधन', 'इश्क', 'पृथ्वी' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर ती मल्याळम चित्रपटांकडे वळली. 'कालीमन्नू' या मल्याळम चित्रपटासाठीच तिने लाइव्ह डिलिव्हरी शूटिंग केली होती.