
दक्षिणेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, ज्यांचा घटस्फोट झालाय. त्यांनी इंडस्ट्रीमध्येच लग्न केलं होतं.

समांथा रुथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्यबरोबर 2017 साली लग्न केलं. दोघांच लग्न दीर्घकाळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

अमाला पॉलने डायरेक्टर केएल विजय सोबत लग्न केलं. 3 वर्षातच त्यांचं नात संपलं. अमालाने त्यानंतर दुसर लग्न केलं.

रेवती ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने सुरेश चंद्र मेनन यांच्यासोबत 1986 साली लग्न केलं. वर्ष 2013 मध्ये दोघे विभक्त झाले.

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने प्रसिद्ध अभिनेता धनुष सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर 18 वर्षांनी दोघे वेगळे झाले.

सारिका ठाकूरने वर्ष 1988 मध्ये कमल हासन यांच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुली आहेत. अखेर वर्ष 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.