YouTube वर व्ह्यूजचा पाऊस, रील्सवर धुमाकूळ! 2026 मधील सर्वाधिक चर्चेतलं गाणं कोणतं?
60 दिवसांपूर्वी रिलीज झालेलं गाणं, ज्याने मिळवले 28000000 मिलियन व्ह्यूज, या गाण्यावर 20 हजार पेक्षा जास्त जणांनी बनवले रील्स, बनले 2026 मधील सर्वात ट्रेंडिग गाणं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसोहळे, सण-उत्सव आणि कौटुंबिक आनंदाचे वातावरण दाखवणाऱ्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अशाच प्रकारातील ‘थस्साडिया’ हे नवे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

हे गाणे ‘मां इंटी बंगारम’ या चित्रपटातील असून त्यात रंगीबेरंगी सेट्स, उत्सवी वातावरण आणि दमदार नृत्य पाहायला मिळते. या गाण्याला चिन्मयी श्रीपदा आणि पुन्या सेल्वा यांनी आवाज दिला असून संगीतकार संतोष नारायणन यांनी संगीतबद्ध केले आहे.

गाण्याचे बोल रहमान यांनी लिहिले आहेत. पारंपरिक लग्नसोहळ्याच्या धून आणि आधुनिक बीट्स यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो. या गाण्यात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिचा आकर्षक अंदाज आणि दमदार डान्स विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘थस्साडिया’ हे गाणे एप्रिल 2026 मध्ये प्रदर्शित झाले असून अल्पावधीतच यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. गाण्याची सोपी धून, उत्साही वातावरण आणि सहज करता येणारे डान्स स्टेप्स यामुळे अनेक रील्स आणि व्हिडिओंमध्ये त्याचा वापर होत आहे.

कौटुंबिक, विनोदी आणि अॅक्शनचा संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो यशस्वी ठरत आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने जगभरात 46 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.