समंथाची झाली अशी अवस्था; चाहते म्हणाले ‘ओळखणंही कठीण’

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा लेटेस्ट लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. समंथाला ओळखणंच कठीण झाल्याच्या प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात समंथा पोहोचली होती. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated on: May 27, 2025 | 12:08 PM
1 / 5
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये विशेष छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशातच समंथा एका कार्यक्रमात पोहोचली असता तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

2 / 5
या कार्यक्रमातील समंथाचा लूक पाहून सर्वजण थक्क झाले होते. यावेळी तिने बॉडी फिट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये समंथा खूपच बारिक दिसत होती. त्यामुळे तिचं वजन बरंच कमी झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला.

3 / 5
समंथाविषयी अनेकांनी काळजीसुद्धा व्यक्त केली आहे. समंथाला नेमकं काय झालंय, इतकी बारिक का झाली.. असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. बॉडीकॉन ड्रेसमुळे समंथा खूपच बारिक आणि नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती.

4 / 5
समंथाला आता ओळखणंच कठीण झालं आहे, ती आधीपेक्षा खूप वेगळी दिसू लागली आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आजारपणामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचंही काहींनी म्हटलंय.

5 / 5
समंथाला मायोसिटीस नावाच्या ऑटो-इम्युन आजाराचं निदान झालं होतं. यावर उपचार घेताना तिने कामातूनही ब्रेक घेतला होता. औषधं आणि आजारपणाच्या परिणामांमुळे तिचं वजन बरंच कमी झालंय.