
Samsung Galaxy M15 5G Specifications चा विचार करता या फोनमध्ये 6.5 इंचाची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तो या फोनला 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस प्रोसेसर देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा, सोबत 5MP अल्ट्रा-वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. या फोनमध्ये पुढील बाजूस 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. मोबाईलच्या हँडसेटमध्ये 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वापर जास्त नसल्यास दिवसभर तुम्हाला बॅटरीची मदत होईल. हा फोन 25 वॉट वायर्ड फास्ट चार्ज सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना पाच वर्षांकरीता सिक्युरिटी अपडेट्स आणि चार वर्षांकरीता ओएस अपग्रेड्स मिळतील.

Samsung Galaxy M15 5G Price in India या फोनची किंमत किती आहे? स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स आहेत. 4GB/128GB व्हेरिएंटची किंमत 13,299 रुपये तर 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 14,799 रुपये आहे.