
सांगलीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा झोपेत असतानाच लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.सदर खुनाची घटना ही आज (26 जून) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित पतीने 8 आणि 10 वर्षांच्या दोन मुलांसह घटनास्थळावरून पलायन केले. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिलवंती पिंटू पाटील वय 30 असे मृत महिलेचे नाव आहे. तर संशयित पती पिंटू तुकाराम पाटील हा पसार झाला आहे. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

सदर पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहूनगर येथे रहात होते. हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते. याच परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामांच्या ठिकाणी वॉचमन म्हणून राहत होते. त्यांना 10 आणि 8 वर्षांची दोन मुले आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ करणावरून भांडण होत होती. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

याच वादातून 13 जून रोजी मृत शिलवंती ही घर सोडून पुण्यातील बहिणीकडे गेली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात तिच्या पतीने बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी संपर्क साधला असता तिच्या बहिणीने तिकडे आल्याचे सांगितले. यानंतर शनिवारी शिलवंती ही पतीच्या घरी सांगलीत आली. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले होते. शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

घटनेची माहिती मिळताच संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)