खिडकी तोडून आत शिरले, वायर कापल्या, पण कॅश न घेता… मध्यरात्री बँकेत नेमकं काय घडलं?

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत धाडसी दरोडा पडला असून, गॅस कटरने २२ लॉकर फोडून ९.३० लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत.

| Updated on: Jan 09, 2026 | 10:50 AM
1 / 6
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांनी बँकेतील तब्बल २२ लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने फोडले आहे. या दरोड्यात चोराने सुमारे ९ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास बँकेत प्रवेश केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या चोरीत चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीतील रोख रकमेला हात देखील लावला नाही.

3 / 6
पण त्यांनी ग्राहकांच्या वैयक्तिक लॉकरवर डल्ला मारला. गॅस कटरचा वापर करून एकामागून एक २२ लॉकर तोडण्यात आले. हे चोर खिडकीतून आत शिरल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे.

4 / 6
तसेच ही चोरी उघडकीस येऊ नये आणि आपली ओळख पटू नये, यासाठी दरोडेखोरांनी कमालीची खबरदारी घेतली होती. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापल्या आणि पुरावा म्हणून सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) देखील सोबत पळवून नेला.

5 / 6
यामुळे दरोडेखोरांचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासातील ही एक मोठी आणि धाडसी चोरी मानली जात आहे.

6 / 6
या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.