
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटेमध्ये संजय दत्त पत्नीसोबत सप्तपदी घेताना दिसतोय. संजय दत्तने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

संजय दत्तने पत्नी मान्यता दत्त सोबत पुन्हा एकदा लग्न केलय. दोघे लग्नाचे फेरे घेताना दिसले. यावेळी संजय दत्तने भगव्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केलेला.

मान्यता दत्त संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. याआधी त्याची दोन लग्न झालीयत. दोन लग्न मोडल्यानंतर त्याने मान्यताची जीवनसाथी म्हणून निवड केली.

वर्ष 2008 मध्ये संजय दत्तने मान्यतासोबत लग्न केलं. या बॉलिवूड जोडप्याला दोन मुलं आहेत. संजय दत्तने पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत केलेलं. दोघांना एक मुलगी आहे, त्रिशाला. 1996 साली ऋचा शर्माच ब्रेन ट्युमरमुळे निधन झालं.

1998 मध्ये त्याने मॉडल रिया पिल्ले बरोबर लग्न केलं. 2005 मध्ये घटस्फोट घेऊन दोघे वेगळे झाले. त्यानंतर रिया पिल्लेने लिएंडर पेससोबत लग्न केलं. 10 वर्ष हे लग्न टिकलं.