बॉलिवूडचा ‘कंजूस अभिनेता’ कोण? कोट्यवधी रुपयांचा मालक पण…

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या साध्या स्वभावापासून उदार मनापर्यंतचा प्रवास आणि आयुष्यातील काही खास न ऐकलेले किस्से जाणून घ्या.

| Updated on: Oct 03, 2026 | 12:16 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबर स्वभावामुळेही ओळखले जातात. त्यातच एक असा अभिनेता होता जो इतक्या दिलदार मनाचा होता की, त्यानं मित्राला त्याकाळी 96 लाख रुपये दिले आणि दिलेले पैसे कधी परत मागितले देखील नाहीत.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबर स्वभावामुळेही ओळखले जातात. त्यातच एक असा अभिनेता होता जो इतक्या दिलदार मनाचा होता की, त्यानं मित्राला त्याकाळी 96 लाख रुपये दिले आणि दिलेले पैसे कधी परत मागितले देखील नाहीत.

2 / 5

त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांना अनेकदा ‘कंजूस’ समजले जायचे. पण प्रत्यक्षात ते खूप दिलदार होते. पत्रकार हनीफ जावेरी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, संजीव कुमार यांनी मित्रांना सुमारे 96 लाख रुपये उधार दिले. पण ते पैसे त्यांनी कधीच परत मागितले नाहीत.

3 / 5

हनीफ जावेरी यांनी सांगितले की, संजीव कुमार जेव्हा चित्रपटांमध्ये काम शोधत होते, तेव्हा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत खराब होती. आई वडिलांचा तोट्यात चाललेला व्यवसाय सांभाळत होती आणि संजीव यांच्याकडे फक्त दोन जोडी कपडे होते. कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम स्वीकारले. त्यावेळी त्यांना कदाचित हेही माहीत नव्हते की ते सी-ग्रेड चित्रपटांत काम करत आहेत, कारण पैसे कमवणेच जास्त महत्त्वाचे होते.

4 / 5

त्यांनी सांगितले की, संजीव कुमार यांनी आपल्या मृत्यूपत्रात ड्रायव्हरच्या मुलाच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये ठेवले होते. अशा प्रकारे इतरांवर खर्च करणाऱ्या व्यक्तीला कंजूस म्हणणे योग्य नाही. ते फक्त अनावश्यक खर्चाच्या विरोधात होते.

5 / 5

प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांना लग्न न करण्यामागे त्यांचं हृदयविकार हे मुख्य कारण होतं. सुलक्षणा यांना भेटण्यापूर्वीच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की ते कमी वयातच मरणार आणि पत्नीचं आयुष्य दुःखी होईल. म्हणूनच त्यांनी लग्न केलं नाही. संजीव कुमार यांचं 6 नोव्हेंबर 1985 रोजी वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी निधन झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us