आलिशान गच्ची, आकर्षक सजावट अन्…सारा तेंडुलकरच्या घराची झलक न्यारी, किंमत ऐकून व्हाल अचंबित..
सचिन तेंडुलकर हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सचिन तेंडुलकर हाच नाही तर त्याची मुलगी सारा तेंडुलकरही तूफान चर्चेत असते. 100 कोटींच्या घरात सारा तेंडुलकर राहते. सारा तेंडुलकरचे हे घर अत्यंत आलिशान आहे.

सारा तेंडुलकर हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहमीच ती चर्चेत असते. सारा तेंडुलकर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला.
तिचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सारा वैद्यकीय शिक्षणासाठी लंडनला गेली. तिथे तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून पदवी मिळवली. यादरम्यान सारा तेंडुलकर सोशल मीडियावरही सक्रिय राहिली.
सतत आपल्या चाहत्यांसाठी सारा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसली. साराच्या घराला दोराब व्हिला म्हटले जायचे. हे घर मुंबईतील वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर 1926 सालचा हा बंगला आहे.
सचिन तेंडुलकर याने हा बंगला 2007 मध्ये 39 कोटींना घेतला होता. सचिन तेंडुलकरला हा बंगला पुन्हा तयार करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. आता या बंगल्याची किंमत बद्दल 100 कोटी रूपयांच्या पुढे आहे.
हे घर सुमारे 6000 चौरस फुटांत पसरलेले आहे. यात दोन तळघरं, काही मजले आणि एक मोठी टेरेस आहे, ही टेरेस अशीतशी नाही तर एखाद्या आलिशान रिसॉर्टसारखी आहे. अंगणही खास आहे. पूर्ण तेंडुलकर कुटुंब येथेच राहते.