Sara Tendulkar : लाडका भाऊ-वहिनीसाठी सारा तेंडुलकरची खास पोस्ट, अर्जुन-सानियाच्या शाही विवाहाचे Unseen Photo समोर

अर्जुन आणि सानियाचा विवाह मुंबईतील द सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, गौरी खान, एमएस धोनी, साक्षी धोनी आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक मोठे स्टार उपस्थित होते. लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Mar 13, 2026 | 3:34 PM
1 / 10
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 5 मार्चला अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक लग्नबंधनात अडकले. मुंबईतील या भव्य विवाह सोहळ्याला क्रिकेट आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत्या. लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (All Photos : Instagram / Sara Tendulkar)

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर गेल्या काही काळापासून त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 5 मार्चला अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक लग्नबंधनात अडकले. मुंबईतील या भव्य विवाह सोहळ्याला क्रिकेट आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत्या. लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (All Photos : Instagram / Sara Tendulkar)

2 / 10

याच दरम्यान आता, अर्जुनची बहीण, सचिनची लेक सारा तेंडुलकरने लग्नातील काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत. या फोटोंसोबत साराने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी खूप व्हायरल होत आहेत.

3 / 10

साराने लग्नातील काही सुंदर फोटो इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले आहेत, ज्यात तिने तिच्या वहिनी सानियासाठी गोड शब्दांत मेसेज लिहीला आहे. "माझा लहान भाऊ आता सानियाचा झालाय" असं लिहीत तिने त्यांना आयुष्यभराच्या या प्रवासासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 10

देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहोत आणि कोणाचीही दृष्ट न लागो असंही तिने लिहीलं आहे. एवढंच नव्हे तर सानियाच्या रुपात बहीण दिल्याबद्दल, तिने अर्जुनचे आभार मानले आहेत.

5 / 10

साराने तिच्या पोस्टमध्ये अनेक छान फोटो, सुंदर क्षण असलेले फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अर्जुन हसत हसत सानियाच्या कपाळावर सिंदूर लावताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण तेंडुलकर कुटुंब सानियासोबत या सुंदर क्षणांचा आनंद टिपताना दिसत आहे.

6 / 10

आणखी एका फोटोमध्ये गुलाबी साडीत सुंदर दिसणारी सारा तिच्या धाकट्या भावासोबत आहे, दोघांच्या चेहऱ्यावर हसून, आनंद खूप झळकतोय.

7 / 10

काही फोटोत सारा तेंडुलकर ही तिचे कुटुंबीय तसेच मित्र-मैत्रिणींसोबत लग्न एन्जॉय करताना दिसली. तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

8 / 10

अर्जुनच्या लग्नात सारा तेंडुलकरचा लूकही खूप चर्चेत होता. तिने या खास दिवसासाठी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली गुलाबी साडी नेसली होती. या साडीत जरी आणि रेशमी भरतकाम होते. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

9 / 10

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, साराने पारंपारिक मीनाकारी नेकलेस, कानातले, मांग टिक्का आणि ब्रेसलेट घातले होते. साराचा नेकलेस बनवण्यासाठी सुमारे 360 तास लागले. त्याची किंमत 40 ते 60 लाख असावी असा अंदाज आहे.

10 / 10

अर्जुन आणि सानियाचा विवाह मुंबईतील द सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या लग्नाची थीम "साज" होती. या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, गौरी खान, एमएस धोनी, साक्षी धोनी आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक मोठे स्टार उपस्थित होते. मुकेश अंबानी देखील त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी यांच्यासोबत उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us