
अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुन मेहता ही कायमच चर्चेत असणारी जोडी आहे. रवी दुबे याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

नुकताच सरगुन मेहता हिने एक मोठा खुलासा केलाय. सरगुन मेहता हिने सांगितले की, पती रवी याच्या मालिकेत ज्यावेळी किस सीन होता, त्यावेळी नेमके काय घडले.

सरगुन मेहता म्हणाली की, रवीने मला सांगितले की, स्क्रिप्टनुसार त्याला किस सीन करावा लागणार आहे. मी त्याला ओके म्हटले. कारण या गोष्टी आज ना उद्या कामाचा भाग होणारच आहेत.

त्यानंतर त्याने माझ्या पालकांची देखील परवानगी घेतली. मी त्याला म्हटले की, त्यासाठी काही गरज नाही. मात्र, त्याने त्यांच्याकडूनही परवानगी घेतली.

अगोदर माझी आणि त्यानंतर माझ्या पालकांची त्याने परवानगी घेतली. आता सरगुन मेहता हिने केलेल्या या खुलाश्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.