
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला महिला डॉक्टरने प्रपोज केले होते, पण बनकर याने नकार दिला होता, असा दावा बनकर याच्या बहिणीने केला होता.

तर दुसरीकडे महिला डॉक्टरच्या वडिलांनी समोर येत मी माझ्या मुलीला भेटायला गेलो होतो, त्यावेळी एक अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस मला भेटला होता. ही धष्टपुष्ट व्यक्ती कोण आहे? त्याचा तपास करावा, अशी मागणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा सस्पेन्स जास्तच वाढला आहे.

असे असतानाच आता तिने ज्या हॉटेलमध्ये स्वत:सा संपवले आणि ज्या रुममध्ये टोकाचे पाऊल उचलले, त्या रुमचा नंबर समोर आला आहे. याच रुममध्ये तिने आत्महत्या करण्यापूर्वी तळहातावर निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची नावे लिहिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरने जिथे स्वत:ला संपवले ते फलटण येथील शिवाजीनगर परिसरात आहे. या हॉटेलचे नाव मधुदीप हॉटेल असे आहे. या हॉटेलमधील रुम नंबर 114 मध्येच महिला डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने शेवटचा फोन कॉल प्रशांत बनकर याला केला होता, असे पोलिसांनी सांगितलेले आहे. असे असताना महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलच्या रुम नंबर 114 मध्ये नेमकं काय घडलं, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा छडा कसा लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.