
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत.

सत्यप्रेम की कथा चित्रपटाला आता रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. मात्र, आता चित्रपटाच्या कमाई कमी झाल्याचे बाॅक्स आॅफिसव कलेक्शनवरून स्पष्ट होत आहे.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने 22 व्या दिवशी बाॅक्स आॅफिसवर 70 लाखांचे कलेक्शन केल्याचे दिसत आहे. कमाईमध्ये मोठी घट झाल्याचे बघायला मिळत आहे.

परत एकदा बाॅक्स आॅफिसवर कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने लगेचच कार्तिक आर्यन याने आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली.

सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन हे दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिल्याचे दिसत आहे.