
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नाची बेडी' या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली देवधर तिच्या कुटुंबीयांसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कर्जत इथल्या फार्महाऊसवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली. या फॅमिली व्हेकेशनचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

कर्जतमध्ये 'प्राजक्तकुंज' नावाने प्राजक्ताचं आलिशान फार्महाऊस आहे. 'प्राजक्तकुंजमध्ये अप्रतिम मुक्काम झाला. प्रशस्त जागा, अप्रतिम जेवण, सुंदर निसर्गदेखावा आणि उत्तम सोय.. या सर्वांसाठी धन्यवाद. प्राजक्ता आता लवकरच एकत्र प्लॅन करुया', असं म्हणत सायलीने फोटो पोस्ट केले.

प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये मोठमोठ्या खोल्या, स्विमिंग पूल, बॉर्नफायर अशा सर्व सोयीसुविधा आहेत. 'द ग्रीन मोन्टाना' या नावाने तिने हे फार्महाऊस एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केलं आहे.

ज्यांना या फार्महाऊसमध्ये रहायचं आहे, ते वेबसाइटवरून बुकिंग करू शकतात. प्राजक्ताच्या या सुंदर फार्महाऊसमध्ये राहायचं असेल, तुम्हाला एका दिवसाचं किती भाडं द्यावं लागेल, माहितीये का?

'द ग्रीन मोन्टाना'मध्ये एकावेळी 15 जण आरामात राहू शकतात. त्यामध्ये किचन, ओव्हन, गॅस, गार्डन, स्विमिंग पूर, बॉर्नफायर अशा सगळ्या सुविधा आहेत. या फार्महाऊसचं वीकेंडचं (शनिवार-रविवार) एका दिवसाचं भाडं 30 हजार रुपयांपर्यंत आहे. तर सोमवार ते शुक्रवार 17 ते 20 हजारापर्यंत भाडं आहे.