
रियाने पहिल्या पोस्टमध्ये टीना डाबी आणि प्रदीप गावंडे एकमेकांना अंगठी घालतानाचे फोटो शेअर केले आहेत . या पोस्टला हार्ट व रिंगची इमोजी व ताराखेचे कॅप्शन दिले आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये रियाने टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला लव्ह, लाफ्टर अँड हॅप्पीनेस असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोमध्ये टीना व प्रदीप दोघेही अत्यंत आनंदी असलेले दिसून येत आहे . याबरोबरच दोघेही वेगवेगळ्या अंदाजात दिसून आले आहेत . रियाने या दोघांच्या बरोबरही स्वतःचाही फोटो शेअर केला आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये टीना व प्रदीप बरोबरच दोन्ही कुटुंबीयांचा समावेश असलेला एकत्रित कुटुंबाचा फोटोही पोस्ट केला आहे.

लग्नानंतर टीना व प्रदीप यांचे ग्रँड रिसेप्शनही पार पडले. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकाऱ्यानी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.