
गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.