लॅपटॉपमुळे फक्त डोळेच नाही, तर चेहऱ्याचंही होतं नुकसान, तज्ज्ञांनी दिला सर्वात मोठा इशारा, उपाय काय?

लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे स्क्रीनसमोर तासन्तास राहणे सामान्य झाले आहे. यामुळे डोळ्यांना त्रास होतो हे सर्वज्ञात आहे, पण स्क्रीनचा त्वचेवरही वाईट परिणाम होतो. निळ्या प्रकाशाचा चेहऱ्याच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो,

| Updated on: Jul 25, 2025 | 11:46 AM
1 / 10
आजकाल लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. ऑफिस असो किंवा घर, अभ्यास असो किंवा ऑनलाईन मिटिंग, तासनतास स्क्रीनसमोर राहणे ही आता काळाची गरज झाली आहे.

2 / 10
स्क्रीनसमोर वेळ घालवल्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येतो याची तुम्हाला माहिती असेलच, पण तुम्हाला माहीत आहे का यामुळे तुमचा चेहराही खराब होऊ शकतो. दररोज ६-८ तास किंवा त्याहून अधिक काळ स्क्रीनसमोर राहिल्याने तुमच्या चेहऱ्याची निर्मळ त्वचाही खराब होते. त्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात.

3 / 10
प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल यांनी याबद्दलचा सर्वात मोठा धोका सांगितला आहे. डॉ. विजय सिंघल यांच्या मते लॅपटॉपसमोर जास्त वेळ बसल्याने त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते.

4 / 10
या स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या चेहऱ्यासाठी फारच घातक ठरु शकतो. या निळ्या रंगाच्या लाईटमुळे तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक नाहीशी होते. यामुळे तुम्ही फार लवकर म्हातारे दिसू लागता.

5 / 10
इतकंच नाही तर सतत लॅपटॉप पाहिल्याने त्वचेचा रंग फिका दिसू लागतो. तसेच जास्त वेळ एकाच जागी बसल्याने रक्ताभिसरणही मंदावते. ज्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसू लागतात.

6 / 10
जर तुम्हाला लॅपटॉप किंवा सिस्टीमवर जास्त वेळ काम करावे लागणार असेल, तर तुमच्या त्वचेची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. सिंघल यांनी काही टीप्स दिल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेचे योग्य पद्धतीने रक्षण करु शकता.

7 / 10
ज्याप्रमाणे सूर्याची अतिनील (UV) किरणे त्वचेसाठी वाईट असतात, त्याचप्रमाणे स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाशही हानिकारक असतो. त्यामुळे, जर तुम्ही बराच काळ स्क्रीनसमोर असाल, तर सनस्क्रीन नक्की वापरा. हा तुमचा त्वचेसाठी 'ब्लू लाईट बॉडीगार्ड' म्हणून काम करतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे सरंक्षण होते.

8 / 10
स्क्रीनसमोर बसताना तुम्ही ब्लू रे प्रकारातील चष्मे वापरू शकता. हे चष्मे केवळ तुमच्या डोळ्यांनाच नाही, तर तुमच्या त्वचेचेही संरक्षण करतात. यामुळे तुमच्या त्वचेचे 'फ्री रॅडिकल्स' (Free Radicals) आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो.

9 / 10
जर तुम्ही ७-८ तास स्क्रीनसमोर काम करत असाल, तर प्रत्येक १-२ तासांनी छोटा ब्रेक घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या स्क्रीनला थोडी विश्रांती मिळते. तसेच तुमच्या डोळ्यांनाही थोडा व्यायाम मिळतो.

10 / 10
तसेच दिवसातून १-२ वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा ताजी राहिली. तुमच्या लॅपटॉप स्क्रीनची लाईट कमी ठेवा किंवा फिल्टर वापरा. अनेक लॅपटॉप आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हा पर्याय असतो. यामुळे हानिकारक किरण तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत.