ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 ची रुंदी मेगा ब्लॉकमध्ये कशी वाढली पाहा ? सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध
ऐतिहासिक ठाणे स्थानकात मध्य रेल्वे आणि ठाणे ते पनवेल-वाशी ट्रान्सहार्बर मार्ग एकत्र येत असल्याने येथील ( फूटफॉल ) रोजची प्रवासी संख्या तब्बल सहा लाख इतकी आहे. त्यामुळे ठाणे स्थानकाला मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हटले जाते. या स्थानकातील जलद लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असणाऱ्या फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढविण्यासाठी मध्य रेल्वेने 63 तासांचा मेगाब्लॉक गुरुवारी रात्रीपासून घेतला असून तो रविवारी दुपारी संपणार आहे.
Most Read Stories