
तीळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तीळ हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. Menopause नंतर होणारी हाडांची झीज टाळण्यास मदत करते. तीळ महिलांसाठी लाभदायक आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळामध्ये लोह भरपूर असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताल्पतेवर (anemia) तीळ उपयुक्त ठरतात. असं देखील सांगतात.

तीळामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स (phytoestrogens) नावाचे नैसर्गिक घटक असतात. हे स्त्रियांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. मासिक पाळीतील अनियमितता आणि रजोनिवृत्तीच्या त्रासांवर उपयोगी ठरतात.

त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. तीळात व्हिटॅमिन ई आणि झिंक असते हे त्वचेला चमकदार ठेवते आणि केस गळती कमी करते. तीळाचे तेल त्वचेवर लावल्यास कोरडेपणा कमी होतो.

ऊर्जादायी आणि पचनासाठी देखील तीळ लाभदायी आहे. तीळामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स, प्रथिने आणि फायबर असतात. त्यामुळे ते शरीराला ऊर्जा देतात आणि पचन सुधारतात. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ अत्यंत उपयुक्त आहेत.