
कॉम्पिटिशनमध्ये डी यावोल वोर्टेक्सने डबल गोल्डचा सन्मान मिळवला. शाहरुख खान आणि आर्यन खानच्या व्हिस्कीने सॅन फ्रांसिस्को वर्ल्ड स्पिरिट्समध्ये धमाका केला. डी यावोल स्पिरिट्सच हे यश आहे असं सीईओ लेटी ब्लागोएवा म्हणाले.

या ब्रांडला 2022 मध्ये SLAB Ventures अंतर्गत लॉन्च करण्यात आलेलं. आर्यन मालक आहे, तर शाहरुख खान सहसंस्थापक आहे. हा भारत आणि जगातील वेगाने लोकप्रिय होणारा व्हिस्की ब्रांड आहे.

डी यावोल वोर्टेक्सची कुठला अवॉर्ड मिळवायची ही पहिली वेळ नाही. याआधी शाहरुख आणि आर्यनच्या या व्हिस्की ब्रांडने स्कॉच व्हिस्की मास्टर्स 2025 मध्ये गोल्ड, न्यूयॉर्क वर्ल्ड स्पिरिट्समध्ये 2024 मध्ये गोल्ड आणि आंतरराष्ट्रीय वाइन अँड स्पिरिट्स पुरस्कार 2024 सोहळ्यातही गोल्ड मेडल मिळवलय.

डी यावोल स्पिरिट्सचे सीईओ लेटी ब्लागोएवा एक न्यूज वेबसाइटशी बोलताना म्हणाले की, "सॅन फ्रांसिस्को स्पर्धा जगातील सम्मानित स्पिरिट पुरस्कारांपैकी एक आहे. त्यामुळे इथे मान्यता मिळवणं महत्वपूर्ण आहे ‘टेस्टिंग सेशन नेहमीच विकासाचा एक महत्वपूर्ण आणि आनंददायी भाग असतो”

भारतात डी यावोल वोर्टेक्सच्या एका बॉटलची किंमत 9950 रुपये आहे. कर्नाटकमध्ये 9,950 रुपये, महाराष्ट्रात 9,800 रुपये, गोव्यात 9,000 रुपये, तेलंगणमध्ये 9,760 रुपये, हरियाणात 6,000 रुपये, दिल्लीत 7,200 रुपये, उत्तर प्रदेशमध्ये 6,300 रुपये आणि पश्चिम बंगालमध्ये 6,210 रुपयांना मिळते.