Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: हे योग्य नाही, त्याची बायको गौरी तिथेच आहे… लालबागच्या राजाच्या चरणी त्या कृतीमुळे शाहरुख झाला ट्रोल

Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या एका कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने त्याची गौरी खान तिथेच उभी असताना असे काही केले की नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 8:09 AM
1 / 5
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पुजा दादलानी दिसत होती. शाहरुखचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर आता त्याच्या एका कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पुजा दादलानी दिसत होती. शाहरुखचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर आता त्याच्या एका कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

2 / 5

शाहरुख खानने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने चेहरा पुसण्यासाठी तिथे उभी असलेल्या पुजा दादलानीची ओढणी घेतली. गौरी खान तिथेच उभी होती. मात्र, शाहरुखने पत्नीच्या ओढणीला चेहरा पुसण्याऐवजी पुजाच्या ओढणीला पुसल्यामुळे ट्रोल केले जात आहे.

3 / 5

शाहरुखचा पुजाच्या ओढणीला चेहरा पुसल्यामुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. एका यूजरने हे योग्य नाही, त्याची बायको गौरी तिथेच उभी आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने अरे तुला थोडं तरी कळायला हवे की बायको तिथे उभी असताना पुजाच्या ओढणीला पुसतो. थोडा तरी सेन्स असायला हवा ना असे म्हणत शाहरुखला सुनावले आहे.

4 / 5

लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेताना शाहरुखने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर गौरी खानने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यांचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

5 / 5

शाहरुख खानने कुटुंबासोबत लालबागच्या राजाची आरती केली. त्यानंतर त्याने दर्शन घेतल्यानंतर कपाळाला टिळा लावला. शाहरुखच्या या कृतीची चर्चा होत असतानाच दुसरीकडे मॅनेजरच्या ओढणीला तोंड पुसल्यामुळे ट्रोल केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us