
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आर्यन खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करताना दिसणार आहे. त्याच्या वेब सीरिजवर काम सुरू आहे.

नुकताच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटो आणि व्हिडीओमुळे आर्यन खान याचे काैतुक केले जातंय.

आर्यन खान याला काही गरीब महिला या पैसे मागताना दिसत आहेत. त्यानंतर आर्यन खान याच्या गाडीतून एक व्यक्ती उतरतो आणि त्या महिलांना पैसे वाटतो.

आर्यन खान याच्या सांगण्यावरून हे पैसे वाटले जात आहेत. आता हेच फोटो आणि व्हिडीओ पाहून लोक त्याचे काैतुक करताना देखील दिसत आहेत.

आर्यन खान याच्यासोबतच सुहाना खान ही देखील यंदा बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहे. सुहाना खान ही सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.