या चित्रपटात शाहरुख खानने कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, पोलिसांनी केलेली अटक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या चित्रपटात कॅमेऱ्यासमोर झालेला न्यूड. या सीनमुळे निर्माण झालेला प्रचंड वाद. शाहरुख खानला जावे लागले होते जेलमध्ये.

| Updated on: Aug 14, 2026 | 5:25 PM
1 / 5
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आज इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ‘माया मेमसाब’ या चित्रपटामुळे तो मोठ्या वादात सापडला होता. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील बोल्ड सीनबाबत प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे शाहरुख खान संतापला आणि त्यानंतर प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.

2 / 5

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका वृत्तपत्रात शाहरुख आणि दीपा साही यांच्याबाबत धक्कादायक दावा करण्यात आला होता. दिग्दर्शकाने दोघांना एका हॉटेलमध्ये पाठवले होते आणि तेथे त्यांनी रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही बोल्ड आणि इंटिमेट सीनचे चित्रीकरण केले असा दावा या वृत्तात करण्यात आला होता.

3 / 5

या बातमीत शाहरुखने न्यूड सीन दिल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे त्या काळात या वृत्ताने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या लेखावर लेखकाचे नाव म्हणजेच बायलाइन नव्हती. त्यामुळे हे वृत्त नेमके कोणी लिहिले, हे स्पष्ट झाले नाही.

4 / 5

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शाहरुख खान प्रचंड नाराज झाला होता. काही काळानंतर एका कार्यक्रमात त्याची संबंधित वृत्तपत्राच्या संपादकाशी भेट झाली. त्यावेळी शाहरुखने त्या पत्रकाराला जाब विचारला आणि त्याच्यावर संताप व्यक्त केला. या भेटीदरम्यान शाहरुखने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर संबंधित पत्रकाराने मुंबई पोलिसांकडे शाहरुखविरोधात तक्रार दाखल केली आणि सुरक्षेची मागणी केली.

5 / 5

तक्रारीनंतर पोलिसांनी शाहरुख खानला अटक केली आणि त्याला वांद्रे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्या काळात शाहरुखची लोकप्रियता वाढली होती. मात्र, या प्रकरणामुळे त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, चिक्की पांडे यांनी शाहरुखला जामिनावर बाहेर काढल्याचे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us