Sharad Pawar Birthday PHOTO : 81 वर्षांचे पवार, 10 निर्णायक प्रसंग

| Updated on: Dec 12, 2021 | 12:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) 80 वा वाढदिवस आहे. (Sharad Pawar 80th Birthday)

1 / 11
शरद पवार

शरद पवार

2 / 11
1978 ला मुख्यमंत्री बनले तेव्हा शरद पवार फक्त 38 वर्षांचे होते. सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी स्वतः मिळवला. पण पवारांनी स्थापन केलेले पुलोद सरकार दीड महिन्यांतच इंदिरा गांधींनी बरखास्त करुन टाकलं.

3 / 11
पवार खासदार झाले तरी वर्षभरातच त्यांचं मन राष्ट्रीय राजकारणाला कंटाळलं. त्यामुळं 1985 ला ते पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्याच्याच राजकारणात राहिले.

4 / 11
शरद पवार सध्या शिवसेनेसोबत आहेत. पण राज्यात शिवसेनेची वेगानं वाढ होतेय असं कारण देऊन पवारांनी 1987 साली समाजवादी काँग्रेस सोडून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.काँग्रेसची संस्कृती टिकवली पाहिजे असंही ते त्यावेळी म्हणाले होते.

5 / 11
2019 च्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपच्या दगाबाजीमुळं शिवसेना दुखावली. पवारांनी ही संधी साधून दुखावलेल्या शिवसेनेला आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करुन भाजपची विजयी घोडदौड महाराष्ट्रात रोखली.

6 / 11
भाजपकडून CBI, ED सारख्या संस्थांकडून विरोधकांना नामोहरम केलं जात आहे. हाच डाव पवारांवरही 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं खेळला. पण पवारांनी मीस्वतःच ED कडं जातो म्हणून डाव उलटवून लावला.

7 / 11
शरद पवार कधीच टोकाची भूमिका घेत नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षातल्या लोकांनाही पवार जवळचे वाटतात. 2015 ला अमृतमहोत्सवानिमित्त गौरव केलेल्या कार्यक्रमाला मोदी आणि सोनियासुद्धा एकाच व्यासपीठावर होते.

8 / 11
2019 च्या विधानसभा निवडणुकीतली पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीला संजीवनी देणारी ही सभा ठरली. या सभेनं ऐन मतदानापूर्वी वातावरणच बदलवून टाकलं.

9 / 11
शरद पवारांनी 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे झाल्या; दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमात पवारांचा गौरव करण्यात आला होता. त्यावेळीही राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्वच पक्षांचे प्रमुख हजर होते.

10 / 11
शरद पवारांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे शेकडो आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. विशेष म्हणजे पवारांनी एकाही आरोप करणाऱ्यावर बदनामीचा खटला दाखल केला नाही.

11 / 11
sharad pawar

sharad pawar