शरद पवार व्हिल चेअरवर, सोबतीला कन्या सुप्रिया सुळे; प्रकृती बिघडल्यानंतर पहिला फोटो समोर

शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लगेच त्यांच्या काही तपासण्या केल्या जातील.

| Updated on: Feb 09, 2026 | 4:02 PM
1 / 5
खासदार शरद पावर यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. ते बारामतीत मुक्कामी होते. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदार शरद पावर यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. ते बारामतीत मुक्कामी होते. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

2 / 5

शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीतून पुण्यात येत असताना शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळे येदेखील होत्या. शरद पवार यांच्या ताफ्यात यावेळी एक रुग्णवाहिकाही होती.

3 / 5

रुबी रुग्णालय परिसरात दाखल होताच शरद पवार कारमधून उतरले. त्यानंतर ते व्हिलचेअरवर बसले. शरद पवारांचा ताफा रुबी रुग्णालयात आला, तेव्हा तेथे गर्दी झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शरद पवार यांच्या काही तपासण्या केल्या जातील.

4 / 5

रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us