Navratri 2026 : घोडा, हत्ती, नाव की पालखी? नवरात्रीत देवीचं वाहन ठरतं तरी कसं? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?

शारदीय नवरात्र २०२६ ला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पारंपरिक मान्यतेनुसार यंदा देवी दुर्गेचे आगमन नेमकंकशावर असणार आणि प्रस्थान कशावरून होणार आहे, हे जाणून घेणार आहोत. देवीच्या वाहनाची निवड वारानुसार कशी ठरते आणि हत्ती-घोड्याच्या वाहनामागे कोणते धार्मिक संकेत मानले जातात, जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Oct 06, 2026 | 3:35 PM
1 / 5
येत्या ११ ऑक्टोबरला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रात घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा, उपवास, जप आणि गरबा-दांडियाचा जल्लोष असतो. हिंदू धर्मशास्त्रात, विशेषतः 'देवी भागवत पुराणात', नवरात्रीत देवीच्या आगमनाचे आणि विसर्जनाच्या वाहनाचे अत्यंत सूक्ष्म व रंजक विवेचन आढळते. आई नेमक्या कोणत्या वाहनावरून येणार हे वारानुसार ठरते. यंदा आई दुर्गेचे आगमन हत्तीवर होत असून, निरोप घोड्यावरून होणार आहे. या वाहनांमागे काय संकेत दडलेले आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.

2 / 5

यंदा आई दुर्गेचे आगमन हत्तीवर होत असून, निरोप घोड्यावरून होणार आहे. या वाहनांमागे काय संकेत दडलेले आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.

3 / 5

प्रामुख्याने देवी दुर्गेचे वाहन सिंह मानले जाते, परंतु नवरात्रात पृथ्वीतलावर येताना देवीचे वाहन हे, आठवड्यतील वारांनुसार बदलते. याचा उल्लेख देवी भागवत पुराणातील एका श्लोकामध्ये आहे.

4 / 5

जर रविवार किंवा सोमवारी नवरात्री सुरु होत असेल तर देवी हत्तीवर येते. जर शनिवार किंवा मंगळवारी आल्यास देवी घोडयावर येते. गुरुवार किंवा शुक्रवारी आल्यास देवी हि पालखीत येते. तर बुधावरी नवरात्री सुरु झाल्यास देवी नौकेतून येते.

5 / 5

यंदा नवरात्रीचा प्रारंभ रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होत असल्याने देवीचे आगमन हे हत्तीवर होणार आहे. तर समाप्ती मंगळवारी होत असल्याने निरोप घोड्यावरून (अश्व) होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us