
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. मार्केटमध्ये सध्या एकामागून एक आयपीओ लाँच होत आहेत. यापैकी एक ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचा आयपीओ आहे. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचा आयपीओ 7 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि 9 जुलै रोजी बंद होणार आहे.

भारत आणि मलेशियातील विमानतळांवर क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्स आणि लाउंज चालवणाऱ्या ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसने 2000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर 1045 ते 1100 रुपयांची प्राईस बँड निश्चित केला आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स 92 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार आहेत.

हा आयपीओ ओएफएस (ऑफर फॉर सेल) असल्याने कंपनीला यातून कोणताही निधी मिळणार नाही, यातून मिळणारे उत्पन्न शेअरहोल्डरकडे जाईल. गुंतवणूकदार किमान 13 शेअर्ससाठी बोली लावू शकतात.

ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी वेगाने वाढणाऱ्या ट्रॅव्हल क्यूएसआर आणि लाउंज क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी ती भारत, मलेशिया आणि हाँगकाँगमधील विमानतळांवर ट्रॅव्हल क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आणि लाउंज व्यवसाय चालवते.

या कंपनीच्या एफ अँड बी ब्रँड पोर्टफोलिओमध्ये 127 पार्टनर आहेत. ही कंपनीची भारतातील 14 विमानतळांवर सेवा देते, यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नईचा समावेश आहे.