
सोयाबीन पाठोपाठ तुरीचा भाव गडगडला. टोमॅटो पाच रुपयांवर आला. तर फुलकोबीचे पण दर आपटले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या शेतकर्याने फुलकोबी फेकून न देता हे काम केले.

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेत असून वाहतुकीचा देखील खर्च निघत नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आहे.

भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या परिसरात माणिक तांगडे या शेतकऱ्याने पण फुलकोबी लावली होती. पण त्याचा लागवडीचा खर्च ही निघाला नाही.

मग तांगडे यांनी फुलकोबी फेकून दिली नाही. तर उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या. मेढ्यांचा कळप त्यांच्या शेतात थांबला. मेंढपाळाना यामुळे धक्का बसला. पण तांगडे यांनी मेंढ्या चारायला परवानगी दिली.

माणिक तांगडे यांना दीड एकर क्षेत्रावरील गोबीसाठी खत रासायनिक फवारण्याअसा एकूण 75 हजार रुपयांचा खर्च आला. मात्र भाव नसल्यामुळे ते संतप्त झाले. पण त्यांनी फुलकोबी फेकून न देता आपल्या शेतात मेंढ्या चरायला सोडल्या.