
शर्लिन चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्याविरोधात तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर राज कुंद्रा याने देखील शर्लिन चोप्राच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. शर्लिन चोप्रा ही अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. नुकताच एक मुलाखत ही शर्लिन चोप्रा हिने दिलीये.

या मुलाखतीमध्ये शर्लिन चोप्रा हिने अत्यंत मोठे खुलासे केले आहेत. शर्लिन चोप्रा हिने स्पष्ट केले की, ती एका मोठ्या राजकारणी व्यक्तीच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

शर्लिन चोप्रा हिने स्पष्ट केली की, त्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम नव्हते, तो फक्त फिजिकल रिलेशनशिपसाठी माझ्यासोबत होता आणि त्यासाठीच तो मला महागडे गिफ्ट देत होता.

पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली, तो देखील आता त्याच्या वडिलांसारखा मोठा राजकारणी झालाय. तो खूप मोठा राजकारणी आहे. लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा करताना शर्लिन चोप्रा दिसली.