
बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मंगळवारी (8 जून) आपला 46 वा जन्मदिवस साजरा केला.

विशेष म्हणजे या निमित्ताने ती पती राज कुंद्रा, बहिण शमिता शेट्टी आणि मुलगा विहानसोबत घराबाहेर आली आणि फोटोग्राफर्ससोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.

शिल्पाने फोटोग्राफर्सला ट्रीटही दिली. या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बर्थडेच्या दिवशीही शिल्पा चांगलीच स्टायलिश दिसली. तिने फ्लोरस जंपसूटसोबत एक व्हाईट ब्लेजर घातलं होतं.

शिल्पा शेट्टी लवकरच बॉलिवुडमध्ये पुनरगागमन करणार आहे. ती अभिनेते परेश रावलसोबत हंगामा 2 मध्ये दिसेल.