
देशभरात आज मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. बॉलिवूड स्टारही दिवाळीचा आनंद लुटत आहेत. अनेक सेलब्रिटी दिवाळी उत्सवाचे प्रत्येक फोटो-व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअरही करत आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही दिवाळीचा उत्सव दणक्यात साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या एका व्हिडिओ आणि काही फोटोंवरून तिचं दिवाळी सेलिब्रेशन धुमधडाक्यात सुरू असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी मुलगा वियानसोबत घराची सजावट करताना दिसत आहे. तर, व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी रांगोळी बनवताना दिसत आहे.

शिल्पा आणि वियान लोकांना दिवाळी आणि धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा देतानाही दिसत आहेत.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

यावेळी तिनं आपल्या घरातील दिवाळी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

ती नेहमीच खास कार्यक्रम आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करते.