90 मधील प्रचंड सुपरहिट गाणं, आजही ऐकून लगेच ठेका धरतात लोक, आजही प्रचंड हिट
बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गाणं, ज्यामध्ये हिरो होता गोविंदा. पण 30 वर्षांची अभिनेत्री फक्त अमिताभ बच्चन यांनाच बघत राहिली. गाणं ठरलेलं प्रचंड हिट.

90 च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपट आणि त्यामधील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशाच एका गाण्याची आठवण अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5 या कार्यक्रमाच्या मंचावर सांगितली.

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘कागज कलम’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट झाली होती. त्या आठवणींना उजाळा देताना शिल्पा भावूक झाल्या.

शिल्पा शिरोडकर यांनी सांगितले की, ‘कागज कलम’ या गाण्याचे चित्रीकरण ऊटी येथील ऐतिहासिक फर्नहिल पॅलेसमध्ये सुरू होते. या गाण्यात त्यांच्यासोबत अभिनेता गोविंदा झळकला होता. चित्रीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. त्याचवेळी सेटवर अचानक अमितजी आले... अमितजी आले...अशी कुजबुज सुरू झाली.

उत्सुकतेपोटी त्यांनी कॉरिडॉरकडे पाहिले आणि तिथून इलेक्ट्रिक ब्लू रंगाचा ओव्हरकोट, मोठे गॉगल घातलेले सुमारे सहा फूट उंच अमिताभ बच्चन आत येताना दिसले.

अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपण अक्षरशः थक्क झाल्याचे शिल्पा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मी इतकी घाबरले की माझे सर्व डान्स स्टेप्स विसरले. हाताला घाम फुटला होता आणि काय करावे हेच सुचत नव्हते. त्यानंतर अमिताभ बच्चन स्वतः त्यांच्याजवळ आले आणि हसत हॅलो, मी अमिताभ बच्चन अशी ओळख करून दिली. मात्र त्यावेळीही आपण प्रचंड घाबरल्याचे त्यांनी सांगितले.