Photo : टिकैत यांना राऊत म्हणाले, तुमचे अश्रू बघून राहावलं नाही !

| Updated on: Feb 02, 2021 | 3:17 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. (Shiv Sena on the Gazipur border)

1 / 6
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.

2 / 6
यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला.

3 / 6
आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला आहे.

4 / 6
यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते.

5 / 6
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला हवा देण्यासाठीच शिवसेना खासदार शेतकऱ्यांना भेटल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

6 / 6
यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही. राजकारणही चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.