
शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसला. हेच नाही तर शिव ठाकरेची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंगही वाढलीये.

शिव ठाकरे हा बिग बाॅस मराठीचा विजेता आहे. शिव ठाकरेने मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात केलाय. बिग बाॅस 16 मध्ये मोठी रक्कम शिव ठाकरेला मिळाली.

नुकताच शिव ठाकरे हा भारती सिंहच्या शोमध्ये पोहचला. यावेळी काही मोठे खुलासे करताना शिव ठाकरे हा दिसलाय. आता याची चर्चा रंगताना दिसलीये.

शिव ठाकरे म्हणाला की, बिग बॉस मराठीनंतर मला एका इव्हेंटला जायचे होते, ज्यासाठी मला कपड्यांची गरज होती. कपड्यांचे माप घेण्यासाठी मी एका स्टुडिओत गेलो. पण तेथील एक व्यक्ती मला कपडेच दाखवत नव्हता.

फक्त कपडेच दाखवत नव्हता तर मला स्पामध्ये बोलण्यात तो बिझी ठेवत होता. मी अस्वस्थ झालो आणि तिथून निघालो. मला तो व्यक्ती परत मेसेज करून परत कधी येणार हे विचारत राहिला.