3 दिवसांच्या मुलीचे अपहरण, वडिलांवर सर्वात मोठा संशय! पोलिसांनाही कळेना, कथा OTT वर घालतेय धुमाकूळ

सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात एका 3 दिवसांच्या मुलीचे अपहरण होते आणि सर्वात पहिला संशय तिच्या वडिलांवर घेतला जातो. आता ही कथा नेमकी काय आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर OTT प्लॅटफॉर्मवर पाहा...

| Updated on: Feb 24, 2026 | 4:09 PM
1 / 5
दक्षिण भारतीय चित्रपटांची चर्चा सुरु झाली की, पूर्वी लोक त्यांचे अॅक्शन सीन, कॉमेडी आणि कलाकारांची खिल्ली उडवत असत. पण आज हीच इंडस्ट्री एकापेक्षा एक उत्तम कथा, अॅक्शन सीन, व्हीएफएक्स आणि अप्रतिम अभिनेते देत आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांमध्ये साउथ इंडियन चित्रपटांची मागणी वाढत आहे. २३ जानेवारीला थिएटरमध्ये अशा एका मल्याळम चित्रपटाने पदार्पण केले, जो इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला.

2 / 5

आज आम्ही ज्या मल्याळम चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो आहे ‘बेबी गर्ल’. या चित्रपटाने लोकांची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकली आहे. अरुण वर्मा यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट एका लहान मुलीच्या अपहरणाभोवती फिरतो, जो पाहणाऱ्या प्रत्येकाचा आत्म्या हादरवून टाकतो.

3 / 5

या क्राइम थ्रिलर चित्रपटाची कथा हॉस्पिटलपासून सुरू होते. तेथे ३ दिवसांच्या नवजात मुलीचे अपहरण होते. घटनेनंतर पोलिस तपासात उतरतात आणि त्यांचा संशय हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीवर जातो. पण कथेला नवे वळण मिळते जेव्हा पोलिसांचा संशय मुलीच्या वडिलांवरही जातो.

4 / 5

पोलिस मुलीचा शोध घेण्याचा प्रचंड प्रयत्न करतात, पण बराच वेळ हे समजत नाही की अपहरण कोणी केले. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड होतात. चित्रपटाचा स्फोटक क्लायमॅक्स पाहण्यासाठी तुम्हाला तो OTT वर पाहावा लागेल.

5 / 5

‘बेबी गर्ल’ हा चित्रपट अरुण वर्मा यांनी दिग्दर्शित केला असून, त्यात मुख्य भूमिकेत निविन पॉली आणि अभिनेत्री लिजोमोल जोसे दिसत आहेत. ५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2 कोटी रुपयांची कमाई केली. तर वर्ल्डवाइड कलेक्शन 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. क्राइम-थ्रिलर चित्रपट ‘बेबी गर्ल’ सध्या Sony LIV या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us