कसा असणार पिळगावकरांचा जावई? महागुरुंच्या लेकीने सांगितलं होणाऱ्या नवऱ्याविषयी

Shriya Pilgaonkar On Marriage: सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया 36 वर्षांची आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये ती पहिल्यांदा लग्नाबाबत बोलली आहे. नेमंक काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: Sep 19, 2025 | 12:24 PM
1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते असणारे सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. पण सध्या श्रिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

2 / 6
श्रियाची काही दिवसांपूर्वी मंडाला मर्डर्स ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. श्रिया ही 36 वर्षांची आहे आणि अविवाहीत आहे. तिला नुकताच एका मुलाखतीमध्ये लग्नाविषयी विचारण्यात आले आहे.

3 / 6
होणाऱ्या नवऱ्याविषयी आणि लग्नाबाबत श्रियाने एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना अगदी स्पष्ट मत मांडले आहे. "गेल्या वर्षभरापासून लोक मला लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारतायत. पण यावर उत्तर द्यायचा माझ्यावर कधीच दबाव नव्हता..." असे श्रिया म्हणाली.

4 / 6
पुढे ती म्हणाली, "माझ्या आईवडिलांनासुद्धा पूर्ण कल्पना आहे की, जेव्हा मला असा मुलगा भेटेल, ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकते, तेव्हा मी लग्न करेन... हा निर्णय घाईघाईत घ्यायचा नाही हे माझं ठरलं आहे..."

5 / 6
श्रियाने पुढे आई-वडिलांविषयी बोलताना म्हटले की, "लग्न करायचे नसेल करी त्यांचा मला पाठिंबा आहे. पण जर तुला लग्न करायचे असेल तर असे समजू नको कोणीतरी मुलगा अचानक नाट्यमयरितीने तुझ्यासमोर येऊन उभा राहील... हे फक्त सिनेमातच चांगले वाटते. जर असे काही आपोआप झाले नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतील."

6 / 6
सचिन पिळगावकर यांचा जवाई कोण असणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता श्रियाने लग्नाबाबत स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर अनेकजण तिच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.