
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकणार आहेत.

मिताली आणि सिद्धार्थच्या लग्न समारंभांना सुरुवात झाली आहे. काल रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे त्यामुळे आता दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे.

'We have entered the घोडा मैदान now.♥️'असं मजेदार कॅप्शन देत मितालीनं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.

तर 'अरं हलद लागली. ?', ' Cant think of a better view.?'असे कॅप्शन देत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

गेली अनेक वर्ष सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताच्या मित्रपरिवाराकडून आणि चाहत्यांकडून #tinypanda हा हॅशटॅग व्हायरल करण्यात येतोय.