Silver Jewellary : चांदीचा दागिना म्हणजे या राशींसाठी महासंकट, अंगावर घातल्यास घडतो अनर्थ!

चांदीचे दागिने हे काही राशींसाठी खूप चा्ंगले मानले जातात. तर काही राशींसाठी चांदीचा दागिना म्हणजे दुसरे संकट असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे चांदी कोणासाठी लाभदायक असते, ते जाणून घेऊ या..

| Updated on: Feb 10, 2026 | 10:41 PM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात धातू आणि ग्रहांचा फार जवळचा संबंध आहे. चांदी या धातूला चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतीक मानले जाते. या धातूमुळे आयुष्यात शीतलता, भावनिक संतुलन, सौंदर्य, समृद्धी येते असे म्हटले जाते. चांदीचा दागिना घातल्यावर मनातील अशांतता दूर होते असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रात धातू आणि ग्रहांचा फार जवळचा संबंध आहे. चांदी या धातूला चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतीक मानले जाते. या धातूमुळे आयुष्यात शीतलता, भावनिक संतुलन, सौंदर्य, समृद्धी येते असे म्हटले जाते. चांदीचा दागिना घातल्यावर मनातील अशांतता दूर होते असे म्हटले जाते.

2 / 5

काही राशीच्या लोकांसाठी चांदी हा धातू शुभ मानला जातो. तर काही राशींसाठी हा धातू म्हणजे दुसरे संकटच आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच चांदीचे दागिने कोणी घालावेत आणि कोणी विशेष काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या...

3 / 5

चांदीचा दागिना घातल्यास कुंडलीतील चंद्रदेव आणि शुक्र ग्रह आणखी मजबूत होतात. यामुळे मानसिक शांती, सकारात्मक उर्जा मिळते. चांदी धातू हा सुख-समृद्धी, मान-सन्मान, आरोग्याशी निगडित अडचणी दूर करतो. नकारात्मक उर्जा आणि वाईट नजरेपासूनही हा धातू रक्षण करतो.

4 / 5

कर्क राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने घालणे शुभ असते. वृषभ राशीच्या लोकांनीदेखील चांचीदा दागिना घातल्यावर आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते. वृश्चिक, तुळ, मीन या राशीच्या लोकांसाठीदेखील चांदीचा दागिना लाभदायक ठरतो. या राशीच्या लोकांनी चांदीचा दागिना घातला तर मानसिक तणाव कमी होतो. तर मेष, सिंह, धनु राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने घालू नयेत असे सांगितले जाते.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us