
शेवग्याच्या शेंग्यांचं सूप बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा 6 ते 8 घ्या, 1 बारीक चिरलेला कांदा घ्या. टोमॅटो – 1लसूण – 3–4 पाकळ्या. आलं – अर्धा इंच तुकडा, काळी मिरी – अर्धा टीस्पून, तूप/तेल – 1 टीस्पून, मीठ – चवीनुसार, पाणी – 2 ते 3 कप घ्या.

शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्या आणि 2–3 इंच लांबीचे तुकडे करा. त्या पाण्यात उकळा जोपर्यंत शेंगा मऊ होत नाहीत. उकडलेल्या शेंग्यांचा गर (pulp) काढून घ्या.

त्यानंतर पॅनमध्ये तूप/तेल गरम करून त्यात लसूण, आलं, कांदा परतून घ्या.त्यात टोमॅटो, काळी मिरी व मीठ घाला. नंतर त्यात शेवग्याचा गर आणि उकळलेले पाणी घालून 5-7 मिनिटे शिजवा.

शेवगा कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियमने भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत राहतात.व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबरयुक्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि अजीर्ण टाळते.

सूपमध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज व वेदना कमी होतात. व्हिटॅमिन A चा उत्तम स्त्रोत असल्याने दृष्टी सुधारते. शेवग्यातील पोटॅशियम रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करते.