
'हॅरी पॉटर' या हाॅलिवूड चित्रपटामध्ये अल्बस डंबलडोरची भूमिका साकारणारे अभिनेते सर मायकल गॅम्बन यांच्याबद्दल एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येतंय.

सर मायकल गॅम्बन यांनी 82 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. त्यांचे निधन झालंय. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि पत्नीने शेअर केली.

सर मायकल गॅम्बन यांनी रुग्णालयात 82 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. सर मायकल गॅम्बन यांना निमोनियाची लागण झाल्याचे सांगितले जातंय.

सर मायकल गॅम्बन यांच्या पत्नीने एक भावनिक पोस्ट शेअर करत सर मायकल गॅम्बन यांच्या निधनाची बातमी शेअर केलीये. सर मायकल गॅम्बन यांच्या निधनाने चाहतेही हैराण झाले.

सर मायकल गॅम्बन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. त्यांचा अत्यंत मोठा चाहता वर्ग देखील बघायला मिळतो.