
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होणार आहे. स्मृती नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्यामुळे अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

या खास दिवसासाठी स्मृतीने पिवळ्या रंगाचा शरारा सूट निवडला, नवरीच्या रुपात स्मृती हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तिने कपाळावर मांगटीका, सुंदर झुमके आणि खूप हलका मेकअप केला होता.

हळदी समारंभात, स्मृती तिच्या क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत हसत हसत पोज देताना दिसली. तिच्या हळदीच्या फोटोंवरून ती किती आनंदी आहे हे दिसून येते. आता तिच्या हळदी समारंभातील सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संपूर्ण हळदी समारंभात पिवळ्या रंगाच्या थीमचा बोलबाला होता. स्मृतीसोबत शेफाली वर्मा, रिचा घोष, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग, शिवाली शिंदे, राधा यादव आणि जेमिमा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.

हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पलाश आणि स्मृतीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे. ते खूप आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.