
महिला क्रिकेटपटू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या लग्न सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लग्न लागले आहे. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा विवाह सोहळा पार पडणार होता. स्मृती संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलशी मानधना फार्महाऊसवर मोठ्या थाटामाटात लग्न करणार होती. पण अचानक आता फार्म हाऊलवरची सजावट काढण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवले जात आहे. त्यामुळे स्मृतीचा विवाहसोहळा रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही वेळापूर्वी मानधना फार्महाऊलवर अचानक एक रुग्णवाहिका पोहोचली होती. या रुग्णवाहिकेतून एका व्यक्तीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याव्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. पण ही व्यक्ती कोण आहे? याबाबत माहिती समोर आलेली नाही. स्मृतीचा होणारा नवरा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलही रुग्णालयातच आहे. मात्र, नातेवाईकाची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगितलं जात आहे.

दुपारनंतर फॉर्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. लग्नाचे संपूर्ण डेकोरेशन काढले जात आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवले जात आहे. त्यामुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लग्न होणार की नाही? याबाबत मानधाना कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

स्मृती आणि पलाशच्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सांगलीत होणाऱ्या या विवाह सोहळ्याला क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातल्या मान्यवर हजर होणार होते. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सर्व खेळाडू अधीच सांगलीत दाखल झाल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ गांगुली, व्ही व्ही लक्ष्मण, सोनू निगम,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. आता स्मृतीचा विवाहसोहळा रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्मृती मानधनाच्या लग्नाआधीचे विधी सुरु असताना अचानक फार्म हाऊसव सांगली पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक पाठवण्यात आले होते. अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती. पण अचानक पोलीस आणि डॉग स्कॉड आल्यामुळे सर्वजण सुरुवातीला घाबरले होते.