Surya Grahan 2026 : दिवसा अंधार दाटणार, 6 मिनिटे 23 सेकंदाचं महाकाय सूर्यग्रहण जग पाहणार, भारतावर काय परिणाम होणार?

भारतीयांना देखील पुढील वर्षी सूर्यग्रहण पाहता येईल. या ग्रहणामुळे दिवसा अंधार होईल. तर 6 मिनिटे 23 सेकंदाचं महाकाय सूर्यग्रहण पाहता येईल.

| Updated on: Oct 09, 2026 | 6:26 PM
1 / 5
Surya Grahan 2027 : सूर्य ग्रहणाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. पुढील वर्षी 2 ऑगस्ट 2027 रोजी दुर्मिळ सूर्यग्रहण पाहायला मिळणार असल्याचा दावा ज्योतिषांनी केला आहे. या सूर्यग्रहणादरम्यान दिवसा अंधार दाटून येणार आहे. चंद्र सूर्याला झाकूण टाकेल. ग्रहणाचा कालावधी 6 मिनिटे 23 सेकंदापर्यंत असू शकतो.  1991 सालानंतरच्या सर्वात दीर्घ खग्रास सूर्यग्रहणांपैकी एक असेल. भारतात कोणत्या देशांतून खग्रास सूर्यग्रहण पाहता येईल, जाणून घ्या.

2 / 5

सूर्यग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील काही भागात पाहायला मिळेल. सूर्यग्रहणाचा मुख्य भाग हा दक्षिण मार्ग दक्षिण स्पेन आणि जिब्राल्टरमधून जाऊन पुढे उत्तर आफ्रिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर चंद्राची सावली मध्य पूर्वेतील काही भागापर्यंत असेल. चंद्र हा सूर्याला झाकेल. त्यामुळे काही काळासाठी सूर्याचे दर्शन होणार नाही.

3 / 5

भारतात सूर्यग्रहण हे 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसेल. देशाच्या विविध भागांमध्ये हे सूर्यग्रहण पाहायला मिळेल. सूर्याचा काही भाग चंद्रामुळे झाकला जाईल. त्यामुळे उर्वरित भाग दिसून येईल. दक्षिण भारतातूनही सूर्यग्रहण दिसेल.

4 / 5

सूर्यग्रहण हे नियमित अंतराने होतात. त्यामुळे एका विशिष्ट ठिकाणाहून सूर्यग्रहण नेहमीचे सोपे नसते. 2027 सालानंतर 22 जुलै 2028 रोजी दुसरं खग्रास सूर्यग्रहण दिसेल. दुसरे सूर्यग्रहण हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या काही भागांमधून जाईल. तर 2028 सालच्या ग्रहणाचा कमाल कालावधी 2027 च्या ग्रहणापेक्षा कमी असेल.

5 / 5

या काळात डोळ्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच थेट सूर्याकडे पाहणे टाळावे अन्यथा तुमच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊ शकते. ग्रहण पाहताना सूर्यग्रहण चष्माचा वापर करू शकता. तर सूर्यग्रहण पाहण्यासाठी सनग्लासेस वापरता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us