
अभिनेक्षी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त दोघांनी कुटुंबीयांसोबत मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणात सोनाक्षीची आई पूनम सिन्हासुद्धा सहभागी झाली होती. परंतु वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव-कुश मात्र उपस्थित नव्हते. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनाक्षी आणि झहीरने जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. 23 जून 2024 रोजी या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोनाक्षी आणि झहीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत डिनरला गेले होते. यावेळी झहीर त्याच्या सासूची खूप काळजी घेताना दिसला. त्याच्या याच नम्र वागणुकीवर नेटकरी फिदा झाले आहेत.

'संस्कारी जावई' असं एकाने लिहिलं. तर 'माणूस निभावणारा असेल तर तो कसाही निभावून घेतो.. मग तो हिंदू असो वा मुस्लीम', असं दुसऱ्याने म्हटलंय.

पार्टीनंतर सोनाक्षीची आई जेव्हा गाडीमध्ये बसायला जात होती, तेव्हा झहीरने त्यांची मदत केली. इतकंच नव्हे तर जाताना तो त्यांच्या पायासुद्धा पडला.