
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल सात वर्ष अभिनेता झहीर इक्बाल याला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात कुटुंबिय आणि खास मित्र उपस्थित होते.

फार कमी लोकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.

दरम्यान, आता पुन्हा अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र झहीर आणि सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

ईदच्या शुभेच्छा देत सोनाक्षीने नवऱ्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र सोनाक्षी आणि झहीरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.