सोनाली कुलकर्णीने पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्यासोबत केला रोमान्स, नंतर 10 वर्षे बोलणं केलं बंद, कोण आहे तो अभिनेता?
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्यासोबत केला होता रोमान्स. त्यानंतर अभिनेत्री 10 वर्षे त्या अभिनेत्यासोबत बोलणं केलेलं बंद. कोण आहे तो अभिनेता?

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सोनालीचा पहिला सिनेमा कोणता होता, हे फार कमी जणांना माहिती असेल.

सोनाली कुलकर्णीने 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केदार शिंदे दिग्दर्शित हा विनोदी सिनेमा त्यावेळी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या चित्रपटात सोनालीने भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

चित्रपटाची कथा नामदेव घोटाळे आणि बकुळा यांच्या भोवती फिरते. या सिनेमातील सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांची जोडीही चर्चेत आली होती. त्यांच्या रोमँटिक प्रसंगांसोबतच ‘मन झुरतंय’ हे गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मात्र, पडद्यावर चांगली केमिस्ट्री दिसणाऱ्या या दोन्ही कलाकारांमध्ये काही काळ अबोला होता.

सोनालीने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, तिच्या आणि सिद्धार्थ जाधव यांच्या नात्यात तब्बल दहा वर्षे संवाद नव्हता. विशेष म्हणजे, दोघांनी ‘इरादा पक्का’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही दोघे एकमेकांशी फारसे बोलत नव्हते.

'मी आणि सिद्धार्थ फक्त त्या चित्रपटातील एका रोलसाठी समोरासमोर उभे राहायचो आणि त्यानंतर पुन्हा आमच्या कामाला लागायचो. जवळपास आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो. आम्ही जवळपास दहा वर्ष एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही' असं सोनालीने सांगितलं होतं.