
बऱ्याच अभिनेत्यांचे, अभिनेत्रींचे लहानपणीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल असतात. आपल्याला त्यांचे लहानपणीचे फोटो, व्हिडीओ बघून पटकन लक्षात येत नाही की हे कोण आहे. आपणही गोंधळून जातो. आता हाच फोटो बघा. हा छोटा मुलगा सध्या साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय. कोण आहे हा?

फोटोत दिसणारा हा मुलगा साऊथच्या चित्रपटांचा सर्वेसर्वा आहे. या अभिनेत्याचे अनेक चाहते आहेत. जर तुम्हाला हा अभिनेता ओळखू आला असेल तर अभिनंदन, तुम्ही खरेच त्याचे चाहते आहात. नसेल ओळखू आला तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या अभिनेत्याला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.

फ्लॉवर समझा क्या, फायर है मै! कोई और समझा क्या अल्लू अर्जुन है मै! आता? आता ओळखू आला का? होय. अल्लू अर्जुन! हा लहान मुलगा दुसरा तिसरा कुणीही नसून पुष्पा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अल्लू अर्जुन आहे.

अल्लू अर्जुनने साऊथ मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. अल्लू अर्जुनचे अनेक चाहते आहेत. त्याचा चित्रपट आला की तो कित्येक दिवस हाऊसफुल असतो. पुष्पा २ मध्ये सुद्धा अल्लू अर्जुन असणारे, या चित्रपटाची देखील प्रेक्षक वाट बघतायत.

अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत लग्न केलंय. अल्लू आणि स्नेहाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अल्लू अर्जुन आणि स्नेहाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अल्लू अर्जुनने 'दम', 'ज्वालामुखी: वीरता : द पॉवर', 'आर्य : एक दिवाना', 'एक और रक्षक', 'डेंजरस खिलाडी २' आणि 'डीजे' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.