
साई पल्लवी अन्य अभिनेत्रींपेक्षा बिलकुल वेगळी आहे. ती तिच्या चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसते. ना तिच्या चित्रपटांमध्ये ती छोटे कपडे परिधान करते.

छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली.

तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये असताना एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता. त्यासाठी स्लिट वाला ड्रेस घातलेला.

साईचा तो डान्स व्हिडिओ ऑनलाइन झाल्यानंतर तिला जो रिस्पॉन्स मिळाला, ज्याची अजिबात अपेक्षा नव्हती. अभिनेत्रीनुसार, लोक तिच्या डान्सवर कमी आणि शरीरावर जास्त फोकस करत होते.

साई पल्लवीला याचं खूप दु:ख झालं. मला वाटलं की, मी ऑब्जेक्टिफाई होत आहे. लोक माझ्या डान्सला नाही, तर माझ्या कपड्यांना बघत होते. त्यानंतर अभिनेत्रीने तोकडे अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणं बंद केलं. दक्षिणेच्या अनेक चित्रपटात काम करणारी साई आता हिंदी सिनेमात डेब्यु करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'एक दिन' चित्रपटातून होणार आहे. त्यानंतर रणबीर कपूरसोबत रामायण चित्रपटात दिसणार आहे.